Wed. Jun 16th, 2021

‘मोदीजी, मदरसे बंद करा’, शिय़ा वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची मागणी

प्राथमिक मदरसांमधून लहान मुलांवर ISISची विचारधारा थोपवली जात आहे. हे रोखण्याकरिता देशातील सर्व प्राथमिक मदरसे बंद केले जावे. अशी मागणी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी PM नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 

पत्राद्वारे मागणी

देशातील मदरसे लवकरात लवकर बंद करायला हवे.

अन्य़था 15 वर्षांनंतर देशातील अर्ध्यापेक्षा अधिक मुसलमान ISIS च्या विचारधारेचे समर्थक होतील.

कोणतेची चळवळ चालवण्यासाठी लहान मुलांवर त्याचे संस्कार केले जातात.

जगात ISIS ही दहशतवादी संघटना हळूहळू मुस्लिमांमध्ये आपली पकड मजबूत करत आहे.

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात ISISचे समर्थक बिनधास्तपणे फिरताना दिसतात.

मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना आर्थिक मदत दिली जाते.

इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली त्यांना दुसऱ्या धर्माविरोधात भडकवण्यात येते.

त्यांना सामान्य शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे.

अनुदानाच्या लालसेपोटी आमच्या मुलांचे भविष्य खराब करण्याचा उद्योग सध्या सुरु आहे.

सामान्य शिक्षणापासून दूर ठेऊन त्यांच्यामध्ये इस्लामच्या नावाखाली कट्टरपंथी विचार पेरले जातायत.

हे मुस्लिम मुलांसाठी तसेच देशासाठीही मोठे धोकादायक आहे.

देश हितासाठी आणि मुस्लिम मुलांच्या भविष्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे.

भारतात सुरु असलेले प्राथमिक मदरसे बंद करण्यात यावे.

धर्माचे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच मदरशांमध्ये प्रवेश देण्यात यावा.

मुस्लिम मुले व्यवस्थितपणे इतर धर्मीय विद्यार्थ्यांसोबत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करु शकतील.

त्यांना प्रत्येक धर्माची ओळख होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *