Sat. Jul 4th, 2020

RJ मलिष्काचं पुन्हा एकदा खड्ड्यांवर गाणं ‘चांद जमीं पर…’

पुन्हा एकदा आर जे मलिष्काने खड्ड्यावर नवे गाणं तयार केले आहे.

मुबंई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का तिच्या खड्ड्यावरील गाण्यांमुळे  प्रसिद्ध आहे. रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना सोसावा लागणारा त्रास RJ Malishka दरवेळी आपल्या विडंबनात्मक गाण्यांमधून व्यक्त करते. कधी ‘सोनू, तुला BMCवर भरोसा नाय का?’ तर कधी ‘झिंगाट’ सारख्या गाण्यांमुळे मलिष्का चांगलीच गाजली. आता मलिष्का पुन्हा एकदा नवं गाणं घेऊन आली आहे.

 

मलिष्का म्हणतेय ‘चांद जमिन पर’!

यावर्षी मलिष्काने टीका करू नये म्हणून BMC च्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी  खड्ड्यांचं पूर्ण केलेलं काम दाखवण्यासाठी मलिष्काला आमंत्रित केलं होतं.

पण पाऊस आला आणि पुन्हा मुंबईतले रस्ते वाहून गेले. जागोजाी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

मुंबईकरांना या रस्त्यांवरून प्रवास करणं अवघड होऊन गेलंय.

अनेक मराठी कलाकारांनीही याविरोधात आवाज उठवलाय. अभिजीत चव्हाण, चिन्मय मांडलेकर, पुष्कर श्रोत्री यांसारख्या कलाकारांनी उपहासात्मक पद्धतीने पालिकेला खड्ड्यांबद्दल जाब विचारलाय.

अशा परिस्थितीत RJ Malishka कशी मागे राहील? ती ही पुन्हा नवं गाणं घेऊन आली आहे.

‘चांद जमीं पर’ असं गाणं असून या गाण्याचा व्हिडिओ तिने Instagram वर आणि Facebook पेजवर पोस्ट केलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *