Sun. Jun 7th, 2020

R.K Studiosला Godrej Propertiesने घेतले विकत

मुंबईतील प्रसिद्ध स्टुडिओ म्हणजे R.K. Studioला Godrej Propertiesने विकत घेतले आहे. गेल्या ऑगस्टपासून कपूर कुटुंबाने R.K Studio विकण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर 2018 रोजी Godrej Properties  R.K. Studioला 200 कोटी रुपयात विकत घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार,  Godrej Properties या जागेवर आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहे. या स्टुडिओच्या विक्रीची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

R.K Studiosची विक्री –

गेल्या काही महिन्यांपासून राज कपूर यांनी बांधलेले R.K Studiosला विकण्याची चर्चा सुरू होती.

या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून Godrej Properties ने विकत घेतले आहे.

2.2 एकर क्षेत्रात पसरलेल्या R.K Studios चे देखभाल करणे शक्य नसल्यामुळे कपूर खानदानाने विकण्याचा निर्णय घेतला.

रणधीर कपूरने सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून ही माहिती खरी असल्याचे म्हटलं आहे.

तसेच R.K Studio विकण्याचा निर्णय संपूर्ण कपूर कुटुंबियांनी घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Godrej Properties या जागेवर आलिशान फ्लॅट्स बांधणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *