Jaimaharashtra news

कोरोना व्हायरसच्या फटक्यामुळे रोरो उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द

कोरोना व्हायरसचा फटका अनेक कार्यक्रमांना बसत आहे. कोरना व्हायरसमुळे राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

रविवारी 15 मार्चला रोरो ( Roll-on/Roll-off) सेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री ( Cm Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तसेच विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रोरो सेवंच उद्घाटन जरी रद्द झालं असलं तरी, रोरो सेवा आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

याबाबत राज्य सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती देण्यात आली आहे.

रो रो पॅक्स ही फेरीसेवा भाऊचा धक्का- मांडवा मार्गावर असणार आहे. या रो रो पॅक्स सेवेमुळे अलिबागमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी प्रवासी बोट उलटली

तसेच रोरोमुळे भाऊचा धक्का ते मांडवा पर्यंतचं अवघ्या ४५ मिनिटांमध्ये पोहचता येणार आहे.

त्यामुळे सुरक्षित आणि जलद सेवेमुळे रोरोला येत्या दिवसात भरघोस प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोरोमुळे प्रदुषणाला आळा बसणार आहे. रोरोमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

या रोरो सेवासाठी एकूण 125 कोटी रुपये खर्च करुन मांडवा येथे टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे. तसेच भाऊचा धक्का इथं टर्मिनल उभारण्यात आलं आहे.

Exit mobile version