Wed. May 22nd, 2019

स्टेशनवर गुंगीचं औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्यांना अटक!

10Shares

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वर प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या दोन जणांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केलंय. त्यांच्याकडून मोबाईल सोन्याचे दागिने तसेच प्रवाशांच्या कपड्याच्या बॅग सुद्धा जप्त करण्यात आल्या.

काय होती Modus Operandi ?

अरविंद मानसिंग आर प्रसाद आणि संजय महंत पटेल अशी या आरोपींची नावं आहेत.

हे दोघेही बिहारच्या चंपारण येथील राहणारे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील पनवेल राहत होते.

गेल्या दोन वर्षापासून मुंबईसह आसपासच्या रेल्वे स्टेशनवर ते जात.

प्रवाशांसोबत बोलून ते कुठे जात आहेत याची चौकशी करत त्यातून ओळख निर्माण करायचे.

त्यानंतर प्रवाशांना गुंगीचं औषध मिसळलेली बिस्कीटं खायला द्यायचे.

त्यानंतर त्यांच्या जवळच्या मौल्यवान वस्तू बॅग मोबाईल यांची चोरी करायचे.

एका प्रवाशाने याबद्दलची तक्रार लोकमान्य टिळक टर्मिनसच्या RPF ला दिली.

पोलिसांनी त्या ठिकाणी असलेली सीसीटीव्ही फुटेज तपासले.

यात दोन संशयित त्यांना आढळून आले.

या दोन संशयितावर लक्ष ठेवून चोरी करीत असताना रंगेहाथ पकडले.

 

चोरांनी दाखवलं प्रात्यक्षिक

सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा आरोपींनी घेतला होता.

पण पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी आपण प्रवाशांना लुटतो याचं प्रात्यक्षिकच करून दाखवलं.

आरोपींनी आतापर्यंत किती प्रवाशांना लुटले आहे, याचा तपास रेल्वे सुरक्षा बल करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरेश सावंत यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *