Tue. Dec 7th, 2021

मुत्थुट फायनान्समध्ये दिवसाढवळ्या दरोडा; 1 जण ठार तर 3 जण जखमी

नाशिकमधील उंटवाडी येथील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात सहा दरोडेखोरांनी आज धुडकूस घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यालयात लूटमार करताना दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली.  त्यात कार्यालयातील 1 कर्मचारी ठार झाला असून 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

नाशिकमधील उंटवाडी येथील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालय आहे.सकाळी 10च्या सुमारास 6 अन्यात लोकांनी मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश केला.

हे 6 अन्यात लोक फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतून तोंडावर काळा कपडा बांधून आले होते.

चौघांच्या हातात पिस्तुल आणि दोघांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. या दरोडेखोरांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली.

कार्यालयातील कर्मचारी सजू स्याम्युअल यांनी त्याला विरोध करताच एका दरोडेखोराने स्याम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

त्यानंतर कार्यालयातील एकाच्या डोक्यावर बंदुकीच्या बटाने प्रहार करत व्यवस्थापकालाही मारहाण केली.

दरोडेखोरांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असतानाच सुरक्षा रक्षकाने सायरन वाजविला.

यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करायला सुरूवात केली.गोळीबार करतच दरोडेखोरांनी तिथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.परंतु तोपर्यंत हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला होता.

या घटनेची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तत्काळ दखल घेत शहरात नाकाबंदी करीत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

या दरोडेखोरांच्या हाती काहीही लागलं नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक याप्रकरणी कसून तपास करत आहे.

दिवसाढवळ्या हो सर्व प्रकार घडल्याने नाशिक शहर हादरून गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *