Wed. Dec 8th, 2021

सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर सशस्त्र दरोडा!

20 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास नालासोपारा येथे एका सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या कंपनीच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडला आहे. या संदर्भात तुळींज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तुळींज पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ITI युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या ओस्वाल नगरी शाखेवर शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला आहे. यात चोरी गेलेल्या मालाची पुष्टी झाली नसली तरी 236 पॉकेट चोरी गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय घडलं नेमकं?

ITI युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड च्या ओस्वाल नागरी शाखेवर शुक्रवारी सकाळी बँक सुरू झाली.

एका टवेरा गाडीतून ६ बुर्खादारी इसम उतरले आणि त्यांनी बँकेच्या शाखेत प्रवेश केला.

त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना दोरीने बांधून ठेवले आणि 12 मिनिटांत दरोडा घालून पोबारा केला.

पोलिसांना चोरांनी आणलेली गाडी विरार मोहक सिटी परिसरात पोलिसांना सापडली आहे.

ही गाडी चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

पोलिसांना प्राप्त झालेल्या CCTV फुटेज च्या आधारे पोलिसांच्या विशेष तुकडी तयार करून दरोडेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती पालघर पोलीस उपाधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

2013 साली सप्टेंबर महिन्यात प्रकारचा दरोडा नालासोपारा पश्चिमेला एक्सिस बँकेवरही पडला होता. आणि याचा पद्धतीने हा दरोडा घालण्यात आला होता. 6 वर्षे होऊनही त्याचा तपास लागला नाही. यामुळे या दरोड्याचा आणि त्या दरोड्याचा काही संबध आहे काय याची तपासणी सुद्धा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *