Fri. Jan 28th, 2022

मिलिटरीमॅनच्या घरात 1.5 लाखांची चोरी!

शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 35000 रुपये तसंच तीन ते साडेतीन तोळे दागिने चोरून नेले. तब्बल दीड लाखाची चोरी झाली आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

काय घडलं नेमकं?

मांगले शिराळा पवारवाडी रोडनजीकच्या जांभळेवाडी येथे संभाजी पांडुरंग सपकाळ राहणार मिलिटरीमॅन आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या राहत्या घराशेजारीच ऊस शेती आहे.

चोरट्यांनी घराच्या मागील दारातून कडी कोयड्यांचे नटबोल्ट्स काढून आत प्रवेश केला.

कपाटातील 35000 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली.

तसंच तीन सोन्याच्या चेन, दोन अंगठ्या आणि बाकीचे दागिने असे तीन ते चार तोळे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

या घटनेची नोंद शिराळा पोलीस स्टेशनला झाली असून पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *