Tue. Oct 19th, 2021

वाड्रांच्या भ्रष्टाचारात राहुल गांधींचा संबंध – स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेत जमीन घोटळ्यात प्रियंका गांधी- वाड्रा यांचाही समावेश असल्याचा त्यांनी आरोप लावला आहे. रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे तशीच राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी व्हावी असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर घणाघाती टीका करत त्यांच्यावर अनेक आरोप लावले.

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ?

जमीन घोटळ्यात वाड्रांच्या भ्रष्टाचारात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचाही समावेश आहे.

तसेच राहुल गांधी यांचे आर्म डिलर यांच्याशीही संबंध असल्याचा दावा स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मिळून जमीन खरेदी केली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

वाड्रांच्या जमीन खरेदी घोटळ्यात खरा चेहरा राहुल गांधी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी- वाड्रा यांचेही आर्म डिलरशी संबंध आहेत असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी देशाला याबद्दल उत्तर द्यावे अशी मागणी स्मृती इराणी यांनी दिली आहे.

रॉबट वाड्रा यांच्यावर हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनायाकडून चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *