Sat. May 25th, 2019

मतदान भारतात, झेंडा पॅराग्वेचा; रॉबर्ट वाड्रा सोशल मीडियावर ट्रोल

0Shares

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या सहाव्या टप्प्यात दिल्लीमध्येही मतदान पार पडले. दिग्गज कलाकारांसह दिग्गज राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गांधी कुंटुंबियांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच प्रियांका गांधी वाड्रा आणि पती रॉबर्ट वाड्रांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान केल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी शाईबरोबर काढलेला फोटो प्रचंड ट्रोल होत आहे.

नेमकं ‘त्या’ फोटोत काय आहे ?

दिल्लीमध्ये झालेल्या मतदानात गांधी कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.

रॉबर्ट वाड्रा यांनी सुद्धा मतदान केले.

मतदान केल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन देणारे पोस्ट शेअर केला.

या पोस्टमध्ये नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे आणि मतदान करावे असे आवाहन केले.

मात्र या पोस्टमध्ये वाड्रा यांनी भारताचा झेंडा न वापरता पॅराग्वेचा झेंडा वापरला आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्या चूकीमुळे नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केले आहे.

वाड्रा यांनी ही पोस्ट डिलीट केली असून त्याऐवजी दुसरी पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *