Mon. Jan 17th, 2022

अफगाणिस्तान रॉकेट हल्ल्यानं हादरलं

अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.

अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घोषणेपासून तालिबाननं अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली.

  • अफगाणिस्तानात रॉकेट हल्ला
  • अमेरिकन लष्कराने परतीचा रस्ता धरला
  • अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं
  • तालिबानचे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न
  • अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा तालिबानचा दावा
  • अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा
  • मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाचा दावा
  • तालिबानने उत्तर अफगाणिस्तानातल्या जुन्या बालेकिल्ल्यात बसवला जम
  • गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांच घरातून पलायन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *