Tue. Jun 2nd, 2020

‘गँगस्टर’ बनणार ‘मॉन्स्टर’, #KGF2 मधील रॉकीभाईचा लूक ‘असा’ असेल!

‘बाहुबली’नंतर दक्षिणेतल्या ज्या सिनेमाने Bollywood ला हैराण केलं, तो सिनेमा म्हणजे KGF. KGF chapter 1 हा सिनेमा केवळ कन्नडच नव्हे, तर इतरही भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खान याच्या ‘झिरो’ या सिनेमाला धोबीपछाड दिल्यामुळे हा सिनेमा खूपच गाजला. या सिनेमातील ‘रॉकिंग स्टार यश’ याची ‘रॉकीभाई’ची भूमिका प्रचंड हिट झाली. आता या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे.

या सिनेमातील अभिनेता यश याचा रावडी लूक खूप लोकप्रिय झाला.

सोन्याच्या खाणीत काम करवून घेणाऱ्या अत्याचारी खाणमालक, आणि त्याचा खात्मा करण्यासाठी उभा ठाकलेला गँगस्टर ‘रॉकीभाई’ असा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आलाय.

मात्र हा सिनेमा दोन भागांत बनवण्यात आला असून पहिल्या भागाला तुफान प्रतिसाद मिळाला होता.

दुसरा भाग अजून प्रदर्शित व्हायचा आहे.

पहिल्या भागात यशने वाढलेले केस, वाढलेली दाढी असा रावडी लूक ठेवला होता.

त्यातून खाणीच्या मातीत मळलेलं शरीर आणि माती लागलेला चेहरा असाच त्याचा सिनेमाभर लूक होता.

आता दुसऱ्या भागात त्याचा हाच लूक असणार की आणखी वेगळा लूक असेल, याकडे त्याच्या फॅन्सचं लक्ष लागलंय.

अशातच यशने आपला एक हटके फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आपला नवा लूक सादर केलाय.

गंमत म्हणजे या लूकमध्ये त्याचा चेहरा पूर्ण दिसतच नाही.

मात्र त्याचे केस आणि दाढी यांमुळे हा लूक तसाच राहणार असल्याची कल्पना नक्की येते.

आता या लूकमध्ये रॉकीभाई काय कमाल करतो, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *