Jaimaharashtra news

अन् मुंबईत मोठा रेल्वे अपघात होता होता टळला

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत रेल्वे अपघात होता होता टळला. ट्रॅकवरील लोखंडी रॉडमुळे रेल्वेला पुन्हा अपघात होणार होता.

 

मात्र, सतर्क मोटरमनमुळे हा अपघात टळला. 2 गर्दुल्ल्यांनी रेल्वे रूळांवर हा लोखंडी रॉड टाकला होता.

 

या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लोखंडी रॉड चोरून हे 2 गर्दुल्ले सँडहर्स्ट रोडहून पनवेलला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले.

 

रे रोडवर पोलीस पकडतील या भीतीनं त्यांनी लोखंडी रॉड ट्रॅकवर फेकला. त्याचवेळी अंधेरीहून सीएसटीला जाणाऱ्या मोटरमनला ट्रॅकवर लोखंडी रॉड दिसला. त्यांनी अपघात टाळण्यासाठी भरधाव ट्रेनला ब्रेक लावून थांबवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लोकलचे 3 डबे लोखंडी रॉडवरून गेले होतं. सुदैवानं रेल्वेला कोणताही अपघात झाला नाही.

Exit mobile version