Jaimaharashtra news

रोजर फेडरनं मिळवलं आठव्यांदा विम्बल्डन

वृत्तसंस्था, स्वित्झर्लंड

 

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं. फायनलमध्ये फेडररने मारिन सिलिचचा 6-3, 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

 

फेडररचे हे कारकिर्दीतील 19 वं ग्रँड स्लॅम असून आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. याआधी विल्यम रेनेश़ॉ आणि पीट संप्रास यांनी प्रत्येकी सात वेळा विम्बल्डनच्या विजेतेपदांना गवसणी घातली होती.

Exit mobile version