Tue. Oct 19th, 2021

रॉजर फेडररने सलग आठव्यांदा पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ग्रासकोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डनच्या अखेरच्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली.

 

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचवर मात करुन फेडररने आठव्यांदा विजेतेपद पटकावले.

 

फेडररनं विम्बल्डन स्पर्धे जिंकण्याचा विक्रम सर्वाधिक वेळा रचला. याआधी पीट सॅम्प्रसच्या सात वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या विक्रमाशी फेडररने बरोबरी केली होती.

 

मात्र, आठवं विजेतेपद पटकावून त्याने सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *