एशियन गेम्स 2018 टेनिस पुरुष दुहेरीत भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक

जय महाराष्ट्र वेब न्यूज, जकार्ता

 

इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2018 च्या स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे.

टेनिस पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा-दिविज शरण जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीवर 6-3, 6-4 ने मात करून सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं.

पुण्यात टेनिसचे धडे गिरवणाऱ्या अंकिता रैनानं गुरुवारी टेनिस महिला एकेरीत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे भारतीयांचे लक्ष बोपण्णा-शरण जोडीवर लागून होत.

सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत त्यांनी हे सोनेरी स्वप्न साकार करून दाखवलं.

कझाकिस्तानच्या एलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येअसेयेव या जोडीवर आपल्या उत्तम खेळीने मात करत बोपण्णा-शरण जोडगोळीनं 52 मिनिटांत सुवर्ण कामगिरी केली.

उपांत्य फेरीत रोहन बोपण्णा-दिविज शरण यांना विजयासाठी चागलाचं सघर्ष करावा लागला होता. जपानच्या जोडीविरुद्धचा हा सामना भारतीय वीरांनी शेवटच्या सेटमध्ये 10-8 असा जिंकला होता.  

Exit mobile version