Fri. Aug 12th, 2022

रोहन मुथाने माफी मागितल्यावर ‘ते’ गप्प बसले

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ८५ वर्षीय स्वयंसेवकाने रुग्णालयात स्वतःला मिळालेली खाट एका तरुण रुग्णाला देत आपला प्राण सोडला. त्यांच्या त्यागाचं सर्वत्र कौतुक होत असताना रोहन मुठा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे काही प्रसारमाध्यमांनी याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र आता या सर्व शंकांना रोहन मुथा यांच्या पोस्टने पूर्णविराम दिला आहे. त्या व्हिडिओबाबत रोहन मुथा यांनी माफी मागितली आहे.

‘नागपुरच्या नारायण दाभाडकरांनी आपला बेड एका तरूण युवकासाठी दिल्याची बातमी आली. त्या संदर्भात सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला. ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं. मी तो व्हिडीओ न तपासता ट्विटरवरवर पोस्ट केला. माझ्या त्या ट्विटची बातमी लोकसत्ताने केली.आता मी पण एक सोशल मीडिया यूजर आहे. जे समोर आलं ते टाकलं. चूक इतकीच झाली की ते मी तपासून पाहिलं नाही. त्याबद्दल बिनशर्त माफी’, असं रोहन मुठा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणत माफी मागितली आहे.

‘खरं काय ते लक्षात आल्यावर तो व्हिडीओ डिलिटही केला आहे. जग सोडून गेलेल्या माणसांबद्दल बोलताना चारदा बातमी तपासून घ्यायला हवी. दिवसभरात असंख्य व्हिडिओ आणि बातम्या येतात, त्या प्रत्येक पडताळणी आपण करत नाही. पण किमान संवेदनशील बातम्या तरी तपासून बघायला हव्यात आणि यापुढे नक्की तपासून पाहणार. पण चूक लोकसत्ताची आहे. लोकसत्ता एक जबाबदार वृत्तसंस्था आहे. त्यांनी कोणतीही बातमी छापताना त्या बातमीची पडताळणी करायला पाहिजे’, अशी टीकाही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ८५ वर्षीय स्वयंसेवकाने रुग्णालयात स्वतःला मिळालेली खाट एका तरुण रुग्णाला दिली. नारायणराव दाभाडकर असे त्यांचे नाव असून त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. नागपूर येथील रहिवासी असलेले नारायणराव दाभाडकर यांनी दाखवलेली उदारता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी काही दिवस प्रयत्न केल्यानंतर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये खाटेची व्यवस्था झाली. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना श्‍वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करीत असताना त्यांचे लक्ष एका रडणाऱ्या महिलेकडे गेले. तिच्या ४० वर्षीय पतीला ताबडतोब ऑक्सिजन मिळणे गरजेचे होते.

नारायण दाभाडकर यांनी वेळ न घालवता आपल्याला मिळालेली खाट त्या गरजू व्यक्तीला देण्याची विनंती तेथील परिचारिकेला केली. ‘मी माझे जीवन जगलो आहे. खाट उपलब्ध असल्यास या महिलेच्या पतीला उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या परिवाराला त्यांची गरज आहे’ असं म्हणत त्यांनी स्वतःला मिळालेली खाट तरुणाला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.