Wed. Jul 28th, 2021

“या” अभिनेत्रीला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

नाट्य क्षेत्रातील यंदाचा 2019 मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे.  5 नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी याच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते जयंत सावरकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  आहे.

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही 1960 पासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ‘ रंगभूमिदिना’ दिवशी हे मानाचे पदक दिले जाते.

या पुरस्काराचे स्वरूप – मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *