Tue. Jan 28th, 2020

… आणि संतापलेल्या रोहित पवारांनी विरोधकांना दिले फेसबुक पोस्ट लिहून उत्तर

‘कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं पवार साहेबांचं राजकारण नाही. गेल्या ५० वर्षांतल्या तीन पिढ्या याला साक्ष आहेत. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे. तसेच शरद पवारांवर टीका ही होत आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्या अमित शहा यांचा पवारांचे नातू रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘गरज पडली की बारामतीत यायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की पवार साहेबांनी काय केले? असं विचारायचं अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहली आहे.

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सभा होती. या सभेत बोलताना केंद्रीय गृहंमंत्री आणि भाजपाध्यक्ष राष्ट्रीय अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगाव” अशी टीका केली होती.

काय आहे फेसबुक पोस्ट ?

“महिलांना समान संधी देण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. राजकीय दबावाला बळी न पडता वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा, जातीपाती व धर्माधर्मांत भांडण लावण्याचा नव्हे तर माणसे जोडण्याचा हा इतिहास आहे.

त्यांच्या राजकारणामुळं ज्यांनी शेतीतून चार पैसे कमावले, त्यांच्या मुलानं तालुक्याच्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी केली आणि आता त्यांचा नातू आयटी कंपनीत नोकरी करू लागलाय. शेतीपासून आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

‘कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं पवार साहेबांचं राजकारण नाही. गेल्या ५० वर्षांतल्या तीन पिढ्या याला साक्ष आहेत. अशी पोस्ट रोहित पवार यांनी  लिहली आहे.

स्वत:च्याच घरात आमदारकी, खासदारकी ठेवणारेच सध्या कुंपणावरून उड्या मारत आहेत. जाड-भरडं पीठ दुसऱ्या पक्षात गेलं. आता जमीनच नांगरायची वेळ आली आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे

अनेक नेते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सोडुन जात आहेत. पक्षात असलेल्या पैकी अनेक नेते जाण्याच्या मार्गावर आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेना पक्ष पवारांना दोष देत आहे. त्यावरुन रोहित पवार संतापले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *