Sat. Jul 31st, 2021

‘हिटमॅन’च्या ‘त्या’ षटकारामुळे जागा झाल्या सचिनच्या आठवणी

World Cup 2019 भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकचा धुव्वा उडवत 89 धावांनी पाकला पराभूत केले. या सामन्याचा सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत संघाला यश मिळवून दिले. रोहित शर्माने १४० धावा आणि कोहलीने 77 धावा केल्या. त्याचदरम्यान रोहितच्या खेळीने २००३ साली विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या षटकाराच्या आठवणी जागा झाल्या.

सचिनच्या आठवणी झाल्या जाग्या !

रविवारी झालेल्या World Cup 2019 सामन्यात पाकचा भारताकडून 89 धावांनी पराभव झाला.

सामन्यात रोहित शर्माच्या १४० धावा आणि कोहलीच्या ७७ धावांची खेळी महत्तवपूर्ण ठरली.

भारत पाकिस्तानच्या या स्पर्धेत पाकिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकले होते, त्यामुळे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजी दिली गेली.

रोहित शर्माची या सामन्यातील खेळी चांगलीच दमदारपणे झाली.

या दमदार खेळीने रोहितने लगावलेल्या षटकारांनी सचिनच्या  2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या आठवणी जागा झाल्या.

८५ धावांवर खेळत असताना रोहितने हसन अलीच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला.

हा षटकार अगदी 2003 साली सचिनने मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता.

2003 सालच्या World Cupमध्ये अशाचप्रकारे शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर  सचिनने  षटकार मारला होता.

सचिन आणि रोहितच्या सामन्यात केवळ इतकाच फरक होता की सचिन त्या सामन्यात ९८ धावांवर बाद झाला आणि रोहितने शतक पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *