विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माचं सूचक ट्विट
‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने वर्ल्ड कपदरम्यान एका सामन्यात फलंदाजी करायला जातानाचा फोटोही पोस्ट केला आहे…

वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात बेबनाव झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच रोहितने विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. पण विंडीज दौऱ्यावर जाण्याआधी विराटने पत्रकार परिषदेत या सर्व चर्चा निरर्थक असून रोहित आणि आपल्र्यात कोणताही वाद नसून सगळं ठीक असल्याचं म्हटलं होतं.
आता विराटच्या स्पष्टीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी रोहितने एक सूचक ट्विट करत अप्रत्यक्षपणे सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवून दिलं आहे. रोहित शर्माने ट्विट करत म्हटलंय की, ‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने वर्ल्ड कपदरम्यान एका सामन्यात फलंदाजी करायला जातानाचा फोटोही पोस्ट केला आहे…
असं आहे रोहित शर्माचं ट्विट
“मी केवळ संघासाठी नव्हे देशासाठी खेळतो” असं ट्विट टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माचं याने केलं आहे.
विराटच्या स्पष्टीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी रोहितकडून हे सूचक ट्विट करण्यात आलं आहे.
ट्विट करून रोहितचा सकारात्मक संदेश दिल्याने टीम इंडियात सगळं काही आलबेल आहे. असं स्पष्ट झालं आहे.
वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात बेबनाव झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.
यावर विराटने पत्रकार परिषदेत या सर्व चर्चा निरर्थक असून रोहित आणि आपल्र्यात कोणताही वाद नसून सगळं ठीक असल्याचं म्हटलं होतं.
I don’t just walk out for my Team. I walk out for my country. pic.twitter.com/S4RFkC0pSk
— Rohit Sharma (@ImRo45) July 31, 2019