तणाव आणि साखरेचे वाढलेले प्रमाण; कारणे तसेच व्यवस्थापन

कारण कोणतेही असो, अतिरिक्त तणावापायी मधुमेहावर नियंत्रण राखणे कठीण होते. शिवाय, मधुमेहासोबत तणाव हा ओघाने सोबतच येतो. त्यात सध्या चालू असलेली महामारी या तणात आणखी भर घालू शकते. अलीकडच्या काळात नोकरीची किंवा आरोग्याची खात्री राहिलेली नसल्याने चिंता वाढल्या आहेत. एखादी व्यक्ती महामारीच्या बातम्या ऐकून भावनाप्रधान होऊ शकते किंवा घराबाहेर जाण्यास बंदी असल्याने, मित्र-मैत्रिणींना भेटता न आल्याने एखाद्या व्यक्तीस एकाकीपणा जाणवू शकतो. हे सगळ्या प्रकारचे ताण बाजूला सारून ठेवून तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवून उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.

तुमच्या रक्तातील साखरेवर तणावाचा कसा परिणाम होतो

डॉ गायत्री घाणेकर यांच्यानुसार मानसिक किंवा शारीरिक तणावामुळे शरीरातील कोर्टीसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. सध्याच्या परिस्थितीत तणावाच्या संप्रेरकाची पातळी वाढल्याने इन्सुलिनचे प्रमाण खालावते. त्यामुळे इन्सुलिनचे कार्य सामान्य स्थितीच्या तुलनेत अवघड होऊन बसते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तुम्ही तणाव दूर करण्यासाठी जंक फूड आणि मद्यपानाला जवळ केल्यास स्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता असते.

शारीरिक व्यायामामुळे एंडोर्फिन संप्रेरकांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ताण कमी होतो. आणि स्नायूंच्या व्यायामामुळे देखील रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. वेळापत्रकाचे पालन करावे निश्चित वेळापत्रकाने तुमचा दिवस प्रभावी होतो. तुमचे मन अधिक शांत होण्यास मदत होते, अगदी सध्याच्या अनिश्चित काळातही! स्वत: काही ठाम निर्णय घेतल्यास, उशीरापर्यंत झोपणे, आहार टाळणे, औषधांचा विसर पडणे किंवा रात्रीची जागरणे हे टाळणे शक्य आहे. तुम्हाला नियमित कामे कधी करायची आहेत, याचे भान राहील. वेळापत्रकाची घडी सुरळीत बसल्याने तुम्हाला पुरेशी झोप घेणे शक्य होईल. आरोग्यदायक आहाराकडे कल वाढेल.
आरोग्यदायक आहार घ्या तणावापायी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे विकाराच्या तणावाशी मुकाबला करण्याकरिता जंक फूडचे सेवन करू नका. तुमचे नियमित आरोग्यदायक वेळापत्रक, ज्यामध्ये संतुलित आहार आणि आरोग्यपूर्ण प्रमाणाचा समावेश असेल.

तणाव टाळून मूड चांगला राहावा यासाठी सक्रीय दिनचर्या उपयुक्त ठरते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब खालावतो. एखाद्याला चांगली झोपही लागू शकते.
जागरूक रहा तुम्ही खोलवर श्वास घेत असल्यास, ध्यान करत असल्यास अधिकाधिक मन:शांती जाणवेल. त्याचप्रमाणे आपल्या आवडीनुसार नियमितपणे किमान १५० मिनिटे वेगवान चालणे, सायकलिंग, पोहणे, योग, नृत्य, इ. शारीरिक क्रिया करणे उपयोगी ठरू शकते. मधुमेही व्यक्तीला मन:शांती लाभल्यास आयुष्य तणावमुक्त होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण खालावण्यास मदत होते.

Exit mobile version