Sun. Aug 18th, 2019

सावधान ! डेटिंग अॅप्समुळे 450 कोटींचा रोमान्स फ्रॉड

0Shares

फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होते. रोज डे पासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत तरुणाई हा वीक साजरा करतात. मात्र खऱ्या प्रेमाच्या शोधात लोक अनेक डेटिंग अॅपचा वापर करातात. या डेटिंग अॅपमुळे तुमची फसवणुक होण्याचीही शक्यता आहे. ब्रिटनमध्ये 450 कोटी रुपयांचा रोमान्स फ्रॉड झाल्याची घटना घडली आहे. ब्रिटेन पोलीस ‘डेट सेफ’ या ग्रुपबरोबर लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अशा प्रकारात वाढ न होण्यासाठी ब्रिटेन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

ब्रिटेन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटेनमध्ये दरवर्षी 450 कोटी रुपयांचा रोमान्स फ्रॉड होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे डेटिंग अॅपमुळे फ्रॉड होण्याची शक्यता असल्याचे ब्रिटिश पोलीस रिपोर्टिंग सेंटर यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर खोटे अकाऊंट बनवून कोणत्याही व्यक्तीशी संबंध बनवायचे. कालांतराने त्या व्यक्तीकडून पैशाची मागणी करत पलायन करायचे अशी फसवणुक होत असल्याची माहिती ब्रिटेन पोलीसांनी दिली आहे. रोमान्स फ्रॉडमध्ये अधिकतर 63 टक्के स्त्रीयांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 50 वर्षाहून अधिक वयाच्या स्त्रीयांची फसवणुक होत आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *