रुट कॅनल करताना पोटात सुई गेली अन्…
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
रुट कॅनल करताना पोटात सुई गेल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.
दाढ किडली म्हणून भास्कर माळी हे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला डी.वाय. पाटील डेंटल महाविद्यालयात घेऊन गेले होते.
यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपकरणाची सुई मुलाच्या पोटात गेल्याची घटना घडली.
अधिराज माळी असं या मुलाचे नाव असून ड्रील मशीनद्वारे उपचार करण्यास सुरुवात केली आणि मशीनचे बीट म्हणजेच सुई गळू थेट मुलाच्या पोटात गेली.
डॉक्टरांना संशय येताच त्यांनी मुलाच्या पोटाचा एक्सरे काढण्यास सांगितले. सुदैवानं अधिराज माळी सुखरूप असून तपासणीदरम्यान दोन सुई मुलाच्या अन्ननलिकेत
घुसल्या असल्याचे समोर आले.