Wed. Aug 10th, 2022

‘येथे’ मिळतं अवघ्या 1 रुपयात पोटभर जेवण!

2 वेळचं अन्न हिच गरीब, बेरोजगार लोकांपुढे सर्वांत मोठी समस्या असते. महागाईच्या काळात खिशात पुरेसे पैसे नसताना आपलं आणि आपल्या परिवाराचं पोट कसं भरता येईल असा भलामोठा प्रश्न गरीबांपुढे असतो. अशा लोकांसाठी ‘रोटी घर’ सुरू करण्यात आलं असून अवघ्या 1 रुपयामध्ये इथे जेवण मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे.

काय आहे हे ‘रोटी घर’?

कर्नाटकातील हुबळी येथे एक अनोखी संकल्पना राबवण्यात येत आहे.

महावीर युथ फेडरेशनने रोटी घर या नावाचं कँटिन सुरू केलं आहे.

या ठिकाणी ऑफिसमध्ये जॉब करणाऱ्या चाकरमान्यांपासून ते भिकाऱ्यांपर्यंत सर्वांना 1 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतं.

गरीब, बेरोजगार, कामगार यांना 1 रुपयात अन्न पुरवलं जातं.

गेल्या 6 वर्षांपासून हा रोटी घरचा उपक्रम राबवण्यात येतोय.

1 रुपयामध्ये डाळ, भात, पोळी, भाजी असं पोटभर जेवण या ठिकाणी मिळतं.

एवढंच नव्हे, तर सणावाराला गोड पदार्थही या आहारात समाविष्ट केले जातात.

गरीबांना 2 वेळचं पोट भरता यावं. कुणी उपाशी राहू नये, या हेतूने अन्नदानाचे अनेक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी ‘अक्षयपात्र’ सारख्या योजनेची दखल जगभरात घेतली गेली आहे. तर अनेक गुरुद्वारांमध्ये अहोरात्र ‘लंघर’ सुरू असतात. इथे लोकांना विनामूल्य जेवण दिलं जातं. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी गरीबांसाठी ’अम्मा कँटीन’ सुरू केलं होतं. या अम्मा कँटिनमध्येही 5 रुपयांत इडली, सांबार, भात असे पदार्थ मिळतात. अनेक नेत्यांनी भाषणांदरम्यान गरीब लोक 5 रुपयांत, 28 रुपयांत पोट भरू शकतात अशा स्वरूपाची वादग्रस्त विधानं केली होती. मात्र 1 रुपयात पूर्ण आहार पुरवणारं रोटी घर मात्र या वादग्रस्त विधानांनाही पुरून उरलंय आणि गरीबांना चांगल्या प्रतीचं अन्न पुरवत असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.