Fri. Aug 12th, 2022

प्रदर्शनापूर्वीच ‘RRR’ ची कमाई 70 कोटी

भारतीय सिनेमाच्या भव्यतेची परिभाषाच बदलून टाकणाऱ्या ‘बाहुबली’ या सिनेमाचे दिग्दर्शक SS राजामौली यांचा आगामी  ‘RRR’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच विविध कारणांनी गाजतोय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल, हे तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजेल. मात्र रिलीजला अजून बराच अवकाश असतानाही प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने 70 कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘RRR‘ ने कमवले 70 कोटी

बाहूबली सिनेमाचे दिग्दर्शक SS राजामौली यांचा ‘आर आर आर’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने 70 कोटी कमवले आहेत.

या सिनेमाचं बजेट 300 कोटी आहे.

‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर SS राजामौलींनी या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

RRR सिनेमाच्या निर्मात्यांनी विदेशी थिएट्रिकल राइट्सच्या आधारावर 70 कोटींची  कमाई केली आहे.

सिनेमाने प्रदर्शनापूर्वी 70 कोटींची कमाई केली, तर प्रदर्शनानंतर आणखी कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिनेमा एका काल्पनिक कथेवर आधारित असून 1920 मधील स्वतंत्र सैनिक, अल्लूरी सिताराम राजू आणि कोमाराम भीम यांची ही कथा आहे.

हा सिनेमा 30 जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे असल्याची माहिती राजा मौली यांनी दिली. तेलुगू सुपरस्टार Jr. NTR आणि रामचरण तेजा या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. बॉलिवूडमधील आलिया भट्ट आणि अजय देवगणही या सिनेमात विशेष भूमिकेत चमकणार आहेत.

‘RRR’ ‘बाहुबली’पेक्षाही भव्यदिव्य, 1 सीनवर तब्बल 45 कोटी खर्च!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.