Sun. Aug 18th, 2019

आधीच 2 लाख कोटींचे कर्ज, काँग्रेसला कर्जमाफी कशी जमणार?

0Shares
कॉंग्रेसने आपल्या वचनपत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर विश्वास ठेवत मध्य प्रदेशातील शेतकरी मतदारांनी कॉंग्रेसला हात दिला. कमलनाथ यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यावर आबोहवामधील शेतकऱ्यांनी ताबडतोब कर्जमाफीसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
 मध्य प्रदेशची सध्याची परिस्थिती पाहता मात्र काँग्रेस सरकारला आपलं आश्वासन पूर्ण करणं कसं जमेल, असा प्रश्न आहे. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवरील कर्ज हे तब्बल 65 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर सरकारच्या तिजोरी पूर्णतः खडखडाट आहे.
2 लाखापर्यतच्या कर्जाची कर्जमाफी-
राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारावेळी सत्तेत आल्यास 10 दिवसात 2 लाखांपर्यतची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. तसे न झाल्यास मुख्यमंत्री बदलू, असं देखील राहुल गांधी म्हणाले होते. 2 लाखांपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या मध्यप्रदेशात अधिक आहे.
परंतु सरकारची तिजोरी रिकामी असून राज्य सरकारवरच जवळपास 2 लाख कोटीचे कर्ज आहे. असं असताना आता कॉंग्रेस कशा प्रकारे कर्ज माफी करणार याबाबत शंका आहे.
मध्यप्रदेशची अर्थव्यवस्था कृषिक्षेत्रावर जास्त अवलंबून आहे कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात मध्य प्रदेशचा विकास त्यामानाने खूपच कमी आहे.
10  दिवसांत कर्जमाफी-
कॉंग्रेस समितीकडून काल मुख्यमंत्री पदी कमलनाथ असतील हे स्पष्ट करण्यात आल्यानंतर कमलनाथ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर कृषी आणि बेरोजगारी या प्रश्नांना प्रधान्य असेल. ते म्हणाले की कृषि क्षेत्र आपल्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य हिस्सा आहे, तर बेरोजगारी आपल्या समोरील मोठे संकट आहे.
सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच 10  दिवसांत शेतकऱ्यांची कर्ज माफ करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मध्यप्रदेश मधील काही नेत्यांच्या मते राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज 30 हजार कोटीच्या आसपास आहे, शिवराजसिंह यांचे सरकार ते 11 हजार 800 कोटी सांगत होते. कॉंग्रेस आता सत्तेत आल्याने शेतकऱ्यांच्या बाजूने विचार होईल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी कॉंग्रेसकडून रोड मॅप बनवण्यात येत आहे. त्यांची जबाबदारी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देण्यात येईल. परंतु सरकारची तिजोरी रिकामी असताना कर्जमाफी कशी होणार हा प्रश्न महत्वाचा आहे.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *