Tue. Oct 19th, 2021

रासप नेत्याने शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटींचं कर्ज घेतल्या प्रकरणी गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

 

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीच्या गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये रात्री 11 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

6 जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावानं गुट्टेंनी 328 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे. बोगस कागदपत्र जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेचं कर्ज मिळणं शक्य नाही.

 

पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन गुट्टेंनी हे कर्ज मिळवल्याचं उघडकीस आलं होतं.

बोगस कागदपत्रांवर गुट्टेंची उचलेगिरी

शेतकऱ्यांच्या नावावर 328 कोटी रुपयाचं कर्ज उचललं
बँक ऑफ इंडिया – 77 कोटी 59 लाख
रत्नाकर बँक – 40 कोटी 20 लाख
आंध्रा बँक- 39 कोटी 17 लाख
युनाटेड बँक ऑफ इंडिया – 76 कोटी 32 लाख
सिंडिकेट बँक – 47 कोटी 27 लाख
युको बँक – 47 कोटी 78 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *