Mon. Oct 25th, 2021

वाढदिवशी केक न कापावा! आरएसएसची नवी मोहीम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

सणासुदीला पाश्चात्य धाटणीचे कपडे नकोत. पुरुषांनी कुर्ता-पायजमा व महिलांनी साडी परिधान करावी, वाढदिवशी केक कापून मेणबत्त्या कसल्या विझवता; ती आपली संस्कृती नाही, घरी कुटुंबातील सगळे सदस्य मिळून गप्पा मारत असतील तर राजकारण, चित्रपट, क्रिकेट असले विषय वज्र्यच करणे उत्तम.. असे जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतली आहे.

कुटुंबांतील संवाद वाढविण्याचा उद्देश त्यामागे असल्याचा दावा करण्यात येत आहे. नागपुरात हा उपक्रम सध्या राबविला जात आहे. मुस्लिम, तसेच ख्रिश्चनधर्मीय कुटुंबांचेही प्रबोधन करण्याचा संघाचा हेतू आहे. 

 

संघाचा हेतू काय?

सणाच्या दिवशी भारतीय पारंपरिक कपडे वापरायला हवे, कुर्ता पैजामा, साडी

जेवणाच्या पूर्वी प्रार्थना करायला हवी

वाढदिवसाला मेणबत्ती पेटवू किंवा विझवू नये

भोजनाच्या वेळी TV पाहू नये

चांगल्या पुस्तकांची निवड करण्यात यावी

TV वर सामाजिक कार्यक्रमच पाहिले पाहिजे

घरी चर्चा करताना चित्रपट, राजकारण आणि
क्रिकेट सोडून इतर विषयांवर चर्चा

परीक्षेमध्ये कॉपी करू नये

समाजातील जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे

महिलांचा सन्मान केला पाहिजे

समाजविषयी विचार केला पाहिजे

आठवड्यात निदान एकदा तरी घरचे सर्व सदस्य एकत्रित आले पाहिजे

आठवड्यात एकदा सोबत जेवण घ्यायला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *