Tue. Sep 27th, 2022

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा पूरग्रस्तांना मदतीचा हात

कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील अनेक नागरिकांना मानवी आणि वित्तहानीस सामोरे जावे लागत असताना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची जनकल्याण समिती, कोकण प्रांत सेवा विभाग आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे.

कोकणातील आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना ज्या ज्या प्रकारची मदत करणे शक्य आहे, ती मदत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येत आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती मुळे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात संघ योजनेतून सुरू असलेल्या सेवाकार्यामध्ये असुरक्षित असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, स्थानिक प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणे, सेवा केंद्र सुरू करून त्याद्वारे भोजन वाटप करणे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, घरे आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत करणे, जंतुनाशकांची फवारणी करणे, काही विशिष्ट ठिकाणी जनरेटरद्वारे तात्पुरती विजेची सोय करणे अशी मदत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे २३ जुलै २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ या कालावधीत महाड येथे ७१ गवे आणि ७ वस्त्यांमध्ये पुढीलप्रमाणे मदत केली आहे.

१) धान्य (किराणा सामान) : ८०४७
२) पाणी : ८६४५ क्रेट
३) अंथरूण / पांघरूण : ३८०२
४) चटई : ३४६८
५) ताडपत्री : ४८
६) खाऊ : २३६३ बॉक्स
७) कपडे / महिला अंतर्वस्त्र / सॅनिटरी पॅड : २६५३ गोणी + बॉक्स
८) फूड पॅकेट : १५,७२४
९) टॉवेल : १,६५८
१०) काडेपेट्या/ मेणबत्ती : ४२३२ बॉक्स
११) दूध : १,१२२ लिटर
१२) पादत्राणे : १,६००
१३) वैद्यकीय लाभ घेतलेली रुग्ण संख्या : ३,००८
१४) भांडी : ५५ संच
१५) वायपर / मॉब/खराटे : ३१०
१६) फिनेल : ९१३

या सेवाकार्यात १ हजार १८१ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर ३४ ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. यामध्ये ३२ डॉक्टर्स तसेच ५४ मदतनीस सहभागी झाले आहेत. यावेळी ३ हजार ८ रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.