Fri. Dec 3rd, 2021

सत्ता भाजपची, सत्ताकेंद्र आरएसएसचं; अमित शहा, मोहन भागवत एकाच विमानानं नागपुरात

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह नागपुरात दाखल झाले. पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच आणि तेही एकाच विमानाने. त्यामुळे भाजपची सत्ता असली

तरी सत्ताकेंद्र नागपूरचं आरएसएस मुख्यालयच असल्याचं समोर येत आहे.

 

भाजपच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण त्याआधी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत

चर्चाही केली.

 

त्यानंतर मग दीड तासाच्या बैठकीत अमित शहा यांनी पक्ष विस्तार आणि प्रसाराबाबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर

बावनकुळे, भाजपचे नागपूर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह नागपूरचे अनेक आमदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *