‘देवेंद्र फडणवीस फार काळ ‘माजी मुख्यमंत्री’ राहणार नाही’

देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेता राहणार नाहीत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांच नशीब मोठं आहे, असंही भय्याजी जोशी म्हणाले.
नागपुरमधील एका बँकेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
भय्या जोशी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेता हे पद आहे.