Fri. May 7th, 2021

RSS मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर

2017 साली पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात संघाचा (RSS) सहभाग होता असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी आज मुंबईतील शिवडी कोर्टात हजर झाले होते. यावेळी मी दोषी नाही असे राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यामुळे कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.

राहुल गांधींना जामीन मंजूर –

गौरी लंकेश यांच्या हत्येमागे संघाचा सहभाग होता असे आक्षेपार्ह ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

त्याप्रकरणी संघाने त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता.

याप्रकरणी आज मुंबईतल्या शिवडी कोर्टात सुनावणी झाली.

राहुल गांधी यांनी मी दोषी नसल्याचे म्हटलं.

त्यामुळे कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

‘राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशा प्रकारच्या घोषणाबाजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *