
45Shares
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
32 वर्षीय विनायक शिरसाट हे आठ दिवसांपासून बेपत्ता होते. 8 दिवसानंतर मुळशी तालुक्यातील घाटात त्यांचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
विनायक शिरसाट यांनी अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता.
नेमकं काय घडलं ?
- शिवणे येथील उत्तमनगर परिसरात राहणारे विनायक शिरसाट हे 5 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते.
- त्यांच्या यासंदर्भात भावाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती.
- भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
- सोमवारी दुपारी पोलिसांनी शिरसाट यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता त्यांचा मोबाईल मुठा गावाच्या हद्दीत असल्याचे समोर आले.
- या आधारे पोलिसांनी मुठा गाव आणि लगतच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली.
- या दरम्यान पिरंगूट ते लवासा मार्गावरील घाटात विनायक शिरसाट यांचा मृतदेह सापडला.
त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची हत्या झाल्याचे समजते.
शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
विनायक शिरसाट हे राजकीय पक्षाशी देखील संबंधित होते.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी वडगाव धायरी आणि परिसरातील अवैध बांधकामांविरोधात आवाज उठवला होता.
भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाराचा पुढील तापास करत आहेत.