Tue. Jun 28th, 2022

अभिनेत्री रुबीना दिलैक ही ठरली बिग बॉस 14 विजेती…

अभिनेत्री रुबीनाचा दिलैक‘बिग बॉस’विजेती ठरली असून रुबीनानी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने बाजी मारली असून रुबीनानी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाय
‘बिग बॉस शो’मध्ये विजेता ठरल्यानं अनेकांनी तीला शुभेच्छा दिल्या आहे. पहिल्या एपिसोडपासूनच रुबीनाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आपण हा शो जिंकण्यासाठी नव्हे तर प्रेक्षकांची मनं जिकण्यासाठी शोमध्ये आल्याचं रुबीनाने पहिल्या भागातचं स्पष्ट केलं होतं.” रुबीनानी बिग बॉसच्या घरात अनेक टास्क करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रतिस्पर्धक असलेल्या राहुल वैदसोबत रुबीनाचे कायम वाद झाल्याचं शोमध्ये दिसून आलं. शोच्या अखेरपर्यंत राहुल वैद्यसोबत रुबीनाची स्पर्धा रंगली मात्र यात रुबीनानेच बाजी मारली. पती अभिनव शुक्लासोबत रुबीना बिग बॉसच्या 14व्या पर्वात सामिल झाली. या शोमध्ये रुबीनाने अभिनव आणि तिच्या नात्याचा खुलासा केला. अभिनव आणि रुबीनाच्या वैवाहिक आयुष्यात दरी निर्माण होत चालली होती. मात्र या नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी रुबीना-अभिनव शोमध्ये एकत्र सहभागी झाले होते. बिग बॉसमुळे रुबीना आणि अभिनवमध्ये पुन्हा जवळीक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक वेळा शोचा होस्ट सलमान खान याने देखील रुबीनाची खरडपट्टी काढली. मात्र रुबीना कायम तिच्या मतांवर ठाम राहिल्याचं दिसून आली. ‘छोटी बहू’ या मालिकेतून रुबीनाने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेतील रुबीनाची भूमिका चांगलीच गाजली. शिवाय त्यानंतर ‘देवो के देव महादेव’ या मालिकेत रुबीनाने साकारलेली सीतेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘शक्ती- अस्तित्व एहसास की’ या मालिकेतील रुबीनाची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत रुबीनाने एका किन्नराची भूमिका साकारली होती.

रुबीना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. बिग बॉसच्या घरात आल्यावरही रुबीना कायम व्यायम करताना दिसतं होती. टास्क आणि घरातील कामांसोबतच योगा करणं, ध्यानस्त बसणं असा तिचा दिनक्रम पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात रुबीनाने खुप धमाल मस्ती केल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धकांचा अपमान करणं तिला फारसं पसंत नव्हत. मालिकांमधून घराघरात पोहचलेली रुबीना बिग बॉसमुळे अधिक चर्चेत आली आहे. मात्र आता बिग बॉसनंतर रुबीना प्रेक्षकांसमोर कोणत्या रुपात येते हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.