Thu. Sep 29th, 2022

सावरकरांच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेत गदारोळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्यावर आज नाशिक महापालिकेत भाजप काँग्रेस नगरसेवक आमनेसामने येत एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून गदारोळ

नाशिक महापालिकेत आज महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

सुरुवातीलाच सत्ताधारी भाजपाकडून सावरकर यांचा विरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात निषेध प्रस्ताव आणला गेला.

याच प्रस्तावरून भाजप काँग्रेस नगरसेवक सभागृहाच्या वेलमध्ये येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय देखील घ्यावा लागला.

राहुल गांधी यांनी सावरकर यांचा बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यसाठी भाजप नगरसेवकांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी काँग्रेस नगरसेवकांनीही भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेचा आरोप

एकीकडे सावरकर मुद्द्यावर भाजप काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात आमनेसामने आले असताना दुसरीकडे विरोधी पक्ष शिवसेना मात्र शांत होती. राज्यात काँग्रेसबरोबर युती असताना देखील नाशिक महापालिकेत मात्र शिवसेना काँग्रेस पासून लांब असल्याची परिस्थिती यानिमित्ताने बघायला मिळालं.

शालेय पोषण आहारच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी आज सभागृहात ही परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.