Tue. Jan 18th, 2022

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी

गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपतींच्या मूर्तींवर उंचीची मर्यादा नको, आम्ही करोनाकाळातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी भूमिका घेतली होती. याबरोबरच तातडीने गणेशोत्सवाबाबतचे सरकारचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकारने कोणतेही धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्याप सुरू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मूर्तीकार आणि मंडळांनी सरकारला तातडीने धोरण जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली या प्रमाणे:

सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूटांची असावी

घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूटांची असावी

गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित

नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी

कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा

विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी

मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी

सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी

गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी

गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *