Wed. Jul 28th, 2021

मुंबई मॅरेथॉनमध्ये एका धावपटूंचं दुर्दैवी निधन

मुंबई मॅरेथॉनमध्ये 64 वर्षीय गजानन मालजलकर या मॅरेथॉन धावपटूंचं दुर्दैवी निधन झालंय. सिनियर सिटीझन गजानन यांना मॅरेथॉन धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते. मालजलकर यांच्याप्रमाणेच आणखी 2 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी या मॅरेथॉन आयोजन केलं जातं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या ड्रीम रनला सुरुवात झाली होती.

भारतीय ऑलिम्पिक खेळाडू सुधा सिंग हिने एलिट भारतीय महिलाच्या गटातून तिसऱ्यांदा पहिलं स्थान पटाकावत हॅटट्रिक केली.

आरती पाटीलने दुसरा आणि नाशिकच्या मोनिका आथरेने तिसरा नंबर मिळवला.

हाफ-मॅरेथॉनमध्ये महिला गटात उत्तर प्रदेशच्या पारुल चौधरीने पहिलं स्थान पटकावलं आहे.

मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं 17 वं वर्षं होतं.

या मॅरेथॉनसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *