Mon. Jan 24th, 2022

छगन भुजबळांच्या विरोधात न्यायालयात धाव

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह सात जणांना दोषमुक्त करण्यात आले. त्यामुळे याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मात्र न्यायालयाच्या निर्णयाला अद्याप आव्हान दिले नसल्याने अंजली दमानिया यांनी जबाबदार नागरिक या नात्याने न्यायालयाकडून भुजबळांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका करत न्याय मागितला आहे.

दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी कुणी न्यायालयात गेल्याची चिंता नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *