Mon. Jan 17th, 2022

रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *