Wed. Jan 19th, 2022

डोंबिवलीमध्ये परळ स्टेशनच्या पुलाप्रमाणे चेंगराचेंगरी होण्याची भीती!

डोंबिवली स्थानकात सकाळी व संध्याकाळी सर्वच फलाटावर जाण्यासाठी गर्दी असते. कल्याण दिशेचा पादचारी पूल तोडल्यानंतर अजून त्याचा सांगाडा तसाच आहे. दुरुस्तीच्या कामाने अजूनही वेग पकडलेला नाही. त्यामुळे प्लॅटफॉमवर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी लोक मधल्या पुलाचा वापर करतात. तर नागरिकही पूर्व पश्चिमेला जाताना याच पुलाचा वापर करतात यामुळे सकाळी खूप गर्दी असते.

मुंबईकडे किंवा कर्जत-कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल एकावेळी स्थानकात आल्या तर विचारूच नका.

जीव घुसमटवून टाकणारी गर्दी होते.

परळ स्टेशनच्या पुलावर जशी चेंगराचेंगरी झाली होती, त्याची पुनरावृत्ती डोंबिवलीला कधीही होऊ शकते.

निरपराध माणसांचे बळी जाऊ शकतात.

तरी रेल्वे प्रशासन यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

महिला आणि सिनियर सिटीझन साठी वेगळी लाईन करावी.

तर पुरुषांसाठी वेगळी लाईन करावी अशी विनंतीवजा पोस्ट एका जागरूक महिलेने फेसबुकवर टाकली.

पोलीस ब्रिजवर जसे असतात, तसंच ते जर स्थानकावरती सुद्धा उभे राहिले तर खूप बरं होईल, असंही या महिलेनं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *