Thu. Jun 17th, 2021

रशियाकडून ‘स्पुटनिक लाईट’ला मंजुरी

रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पुटनिक व्ही कोरोना विषाणूच्या लसीच्या सिंगल डोसच्या वापराला मान्यता दिली आहे. लस उत्पादकांनी याबाबतची माहिती दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने या लसीला तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. ‘स्पुटनिक लाईट’ ७९.४ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे, तर ‘स्पुटनिक व्ही’च्या दोन डोस ९१.६ टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत, असे आरडीआयएफने निवेदनात म्हटले आहे.

स्पुटनिक व्हीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर असे सांगण्यात आले आहे की, स्पुटनिक लाईट वापरुन लसीकरणाला वेग आणता येईल आणि यामुळे साथीच्या या महामारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. अर्थात स्पुतनिक व्ही ही तशी मुख्य लस आहे, परंतु स्पुटनिक लाईट चे स्वतःचे एक वैशिष्ट आहे.

पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, स्पुटनिक लाईट ही महामारीसोबत वेगवान गतीने लाढणारी एक विश्वसनीय लस आहे. याच्या मदतीने, जलद गतीने संरक्षण प्राप्त केले जाऊ शकते, ज्यामुळे विषाणूचा वेगाने पराभव होऊ शकतो. 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान रशियाच्या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी याचा उपयोग केला गेला. ज्यामध्ये लोकांना लस दिल्यानंतर २८ दिवसांनी त्याची माहिती गोळा करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *