Jaimaharashtra news

ट्रम्प यांच्या विधानामुळे संसदेत गोंधळ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले….

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती,’असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आज विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या द्विपक्षीय चर्चेतूनच सुटेल. तो प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणत्याही पक्षाची गरज नाही असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या विधानामुळे संसदेत गोंधळ

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी एक दावा केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी आपण जम्मू-काश्मीर प्रश्न सोडवण्यास मध्यस्थी करु शकतो. असं ही ते म्हणाले आहेत. ‘जर माझी मदत हवी असेल तर मी आवडीन मध्यस्थी करेन. जर माझी मदत हवी असेल तर मला सांगा.’ अशा शब्दात त्यांनी आपली भूमीका मांडली आहे.

मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यावर आज विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. पंतप्रधान मोदींनी या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या द्विपक्षीय चर्चेतूनच सुटेल. तो प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या कोणत्याही पक्षाची गरज नाही असं म्हटलं आहे.

यानंतरही विरोधकांनी गोंधळ चालूच ठेवला. ट्रम्प यांच्या विधानावरून गोंधळ करत संसदेचं कामकाज स्थगित करण्याची मागणीही विरोधकांनी केली.

Exit mobile version