Fri. Sep 30th, 2022

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सर्वोच्च न्यायालयानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.

आता सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. देवासोबत असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

तसेच 10-50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ठरेल.

सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे, त्यामुळे लिंगावरून भेदभाव करणं योग्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटंले आहे.

 शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरण 

  • मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी
  • भगवान अयप्पा ब्रह्मचारी असल्यानं महिलांना प्रवेशबंदी असल्याचा युक्तीवाद
  • गेल्या 30 वर्षांपासून महिला प्रवेशासाठी विविध आंदोलनं
  • 1991मध्ये केरळ उच्च न्यायालयाचा महिलांना प्रवेशबंदी योग्य असल्याचा निर्णय
  • कन्नड अभिनेत्री जयमालांकडून 2006मध्ये मंदिरात प्रवेश केल्याचा दावा
  • वयाच्या 28व्या वर्षी 1987मध्ये जयमालांनी मंदिरात केला होता प्रवेश
  • ‘इंडिया यंग लॉयर असोसिएशन’ची बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
  • महिलांना प्रवेशबंदीचा निर्णय म्हणजे समानतेच्या अधिकाराचा भंग असल्याची तक्रार
  • केरळमधील डाव्या आघाडी सरकारचा याचिकेला पाठिंबा
  • 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरणाची सुनावणी पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.