Fri. Nov 15th, 2019

‘ठाकरे’ सिनेमात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना ‘या’ अभिनेत्याचा आवाज

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या सिनेमाची निर्मिती करत असून सध्या त्याच्या डबिंगचे काम सुरू आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी एका मोठ्या कलाकाराची निवड करण्यात आली आहे.

या बायोपिकमध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. हिंदीतल्या सिनेमासाठी नवाजुद्दीनचाच आवाज असणार आहे. मात्र सिनेमासाठी बाळासाहेबांना अभिनेते सचिन खेडेकर आवाज देणार आहेत. सचिन खेडेकरांनी नुकतंच त्यांचे डबिंग पूर्ण केलं आहे.

या सिनेमाची पटकथा संजय राऊत यांनी लिहिली असून त्यासाठी त्यांना 4 वर्षे लागली आहेत. अभिजीत पानसे सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा मोठ्या पदड्यावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका सिनेमात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू आहे, असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *