Jaimaharashtra news

अजित दादांनी असंघाशी संघ सोडावा, सचिन सावंतांची विनंती

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष पेटला आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे अजित पवारांना एक विनंती केली आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले सचिन सावंत ?

संभाजी महाराजांशी तुलना करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. पण अजितदादांनी संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायला हवा. संभाजी महाराजदेखील परत फिरले होते. त्यानंतर संभाजी महाराज अनेक पिढ्यांचे आदर्श नायक झाले होते.

दादांनी असंघाशी संघ सोडायला हवा, अशी विनंती सचिन सावंतांनी अजित पवारांना आपल्या ट्विट मधून केली आहे.

सचिन सावंत यांच ट्विट

दरम्यान उद्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Exit mobile version