भारतरत्न सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

सचिन तेंडुलकरला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली.भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली असून
रायपूर येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला होता. या स्पर्धेत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.भारताने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मुंबईत परतल्यावर सचिनला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली. त्यामुळे सचिनने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन करून घेतले होते.आता सचिनने डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.
‘डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालोय. लवकरच ठीक होऊन मी परत येईन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत यासाठी मी सर्वांचे आभारी आहे’,असं सचिनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी सचिनसह अन्य चौघांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.