Sun. Oct 24th, 2021

क्रिकेटचा देव सहपरिवार साईबाबांच्या चरणी नतमस्तक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहपरिवार शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. सचिनने आज दुपारच्या सुमारास सहपरिवार साईबांबाच्या समाधीचं दर्शन घेतलं.

साईबाबांच्या दर्शनासाठी सचिन येणार असल्याची माहिती परिसरात पसरली. यानंतर मंदिर परिसरात सचिनला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

तसेच सचिन सहपरिवार दर्शनासाठी जाताना आणि दर्शनानंतर बाहेर आल्यानंतर स्थानिकांनी सचिन सचिन अशा घोषणा दिल्या.

यावेळी सचिनसह त्याचे काही मित्र देखील होते. सचिन दुपारी खासगी विमानाने शिर्डीत दाखल झाला.

सचिनने साईमंदिरामध्ये जाऊन पाद्य पुजा केली. यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने सचिनचा शाल आणि मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच शिर्डीकरांच्या वतीने नगराध्याक्षा अर्चना कातेंनी साईबाबांची प्रतिमा देऊन सचिनचा सत्कार केला.

दरम्यान सचिनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणेची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *