Mon. May 23rd, 2022

‘सुवर्णकन्या’ हिमा दासचं सचिन तेंडुलकरने ‘असं’ केलं कौतुक!

धावपटू हिमा दासने पाचवं सुवर्णपदक मिळवल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका दुमदुमत ठेवलाय. अॅथलेटिक्सच्या विश्वात हिमाची स्वर्ण कामगिरी गाजतेय. 20 दिवसांत 5 सुवर्णपदकांना गवसणी घालणाऱ्या हिमा दासचं सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही Tweet करत हिमाच्या कामगिरीचं कौतुक केलंय. तेंडुलकरने कॉल करून हिमाला शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडुलकरने केलेल्या कौतुकामुळे हिमा दास भारावून गेलीय. आपण यापुढेही अशीच कामगिरी करण्यासाठी अथक परिश्रम करत राहू, असं आश्वासनही हिमाने तेंडुलकरला दिलंय.

हिमा दासची सुवर्ण कामगिरी-

2 जुलैला 200 मीटर पोजनान अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री शर्यतीत 23.65 सेकंदात धाव पूर्ण करून पहिलं सुवर्णपदक मिळवलं.

7 जुलैला पोलंडमधील कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेतही 200 मीटर शर्यतीत 23.97 सेकंदांची नोंद करत दुसरे सुवर्णपदक पटकावलं.

13 जुलैला क्लांदो मोमेरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदात धाव पूर्ण करत तिसरं Gold Medal प्राप्त केलं.

18 जुलैला टबोर ग्रांप्रीमध्ये हिमाने 200 मीटर शर्यतीत 23.25 सेकंदांची वेळ नोंदवत चौथं सुवर्ण पदक पटकावलं.

20 जुलैला नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रांप्री 200 नव्हे तर 400 मीटर शर्यतीतही 52.09 सेकंदांत धाव पूर्ण करत पाचवं सुवर्णपदक मिळवलं.

अवघ्या 2 आठवड्यांत 3 सुवर्णपदकं… हीमा दासची शानदार कामगिरी!

अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने सुवर्णपदकांची लयलूट करणाऱ्या हिमाने यशाने हुरळून न जाता सामाजिक बांधिलकी जपली आहे. आपल्या मानधनातील अर्धी रक्कम तिनं आपल्या आसाम राज्यातील पूरग्रस्तांना देण्याचं जाहीर केलंय.

हिमा दासची अप्रतिम कामगिरी; 15 दिवसात चार सुर्वण पदक

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.