Sun. Jun 20th, 2021

सचिन तेंडुलकरची खास दिवाळी भेट!

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देवच. क्रिकेटच्या इतिहासात त्याने रचलेले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. तो जेव्हा क्रिकेटच्या मैदानात बॅटिंगसाठी उतरत असे, तेव्हा सगळा देश काम थांबवून, श्वास रोखून त्याचा खेळ बघत राही. निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकरबद्दलचं आकर्षण अद्याप कमी झालेलं नाही. मुंबई इंडियन्सचा लाडका सचिन दिवाळीमध्ये पुणेकरांना क्रिकेट धडे देणार आहे.

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीतर्फे पुण्यातील मुला मुलींना सचिन तेंडुलकर क्रिकेटचं मार्गदर्शन करणार आहे. 7 ते 12 आणि 13 ते 18 वयोगटातील होतकरू मुलांना सचिन तेंडुलकर स्वतः क्रिकेटचं प्रशिक्षण देणार आहे. पुण्यातील बिशप्स स्कूलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. केवळ मुंबईतीलच नव्हे, तर थेट इंग्लंडमधील नामांकित क्रिकेटपटू तसेच कोच या शिबिरात मुलांना प्रशिक्षण देणार आहेत.

आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं आणि देशभरातून उत्तमोत्तम क्रिकेटपटू तयार व्हावेत, यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचललं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांनाही क्रिकेटचे धडे मिळावेलत, यासाठीही सचिन तेंडुलकर विशेष प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *